Hari Ha Majha lyrics
by Shreya Ghoshal
हरी हा माझा प्राण-विसावा, प्राण-विसावा
हरी हा माझा प्राण-विसावा, प्राण-विसावा
उघड्या, मिटल्या नयनांना प्रियदर्शन नित्य दिसावा
प्राण-विसावा, हो
हरी हा माझा प्राण-विसावा, प्राण-विसावा
हरी हा माझा प्राण-विसावा, प्राण-विसावा
त्रिभुवन मोहन मला भेटला प्रियकर हा जगजेठी
हो, त्रिभुवन मोहन मला भेटला प्रियकर हा जगजेठी
टाकून मी घरदार नाचले याच्या प्रेमासाठी
हो, राज्य विसरले, रीत विसरली
राज्य विसरले, रीत विसरली, कुलधर्म हि ना ठावा
प्राण-विसावा, हो
हरी हा माझा प्राण-विसावा, प्राण-विसावा
उघड्या, मिटल्या नयनांना प्रियदर्शन नित्य दिसावा
प्राण-विसावा, हो
राणीपद मी सहज त्यागले, हरिदासी मी झाले
राणीपद मी सहज त्यागले, हरिदासी मी झाले
याच्या स्मरणी विश्ना वाजे सुमधुर अमृत प्याले
हो, अनाहातासम ऐकू आला
अनाहातासम ऐकू आला तो श्रुती पावन पावा
प्राण-विसावा, हो
हरी हा माझा प्राण-विसावा, प्राण-विसावा
उघड्या, मिटल्या नयनांना प्रियदर्शन नित्य दिसावा
प्राण-विसावा, हो
नका विचारू "कैसा आहे? कुठले त्याचे गाव?"
नका विचारू "कैसा आहे? कुठले त्याचे गाव?"
देवळात ना कुठे उभा तो, नाही कुठला ठाव
मी आहे
मी आहे हा हरी असण्याचा
मी आहे हा हरी असण्याचा एकच धुंद पुरावा
प्राण-विसावा, हो
हरी हा माझा प्राण-विसावा, प्राण-विसावा
उघड्या, मिटल्या नयनांना प्रियदर्शन नित्य दिसावा
प्राण-विसावा, हो
हरी हा माझा प्राण-विसावा, प्राण-विसावा
हरी हा माझा प्राण-विसावा, प्राण-विसावा
हरी हा माझा प्राण-विसावा, प्राण-विसावा
हरी हा माझा प्राण-विसावा, प्राण-विसावा
हरी हा माझा प्राण-विसावा