Sukhakarta Dukhaharta - Ganpati Arti lyrics
by Shreya Ghoshal
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मन कामनापूर्ती
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती, ओ, श्रीमंगल मूर्ति
दर्शनमात्रे मन कामनापूर्ती
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती, ओ, श्रीमंगल मूर्ति
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरेजड़ित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नूपुरे, रुणझुणती नूपुरे चरणी घागरीया
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती, ओ, श्रीमंगल मूर्ति
दर्शनमात्रे मन कामनापूर्ती
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती, ओ, श्रीमंगल मूर्ति
लंबोदर पीतांबर फणीवर बंधना
सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकष्टी पावावें, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती, ओ, श्रीमंगल मूर्ति
दर्शनमात्रे मन कामनापूर्ती
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती, ओ, श्रीमंगल मूर्ति
घालीन लोटांगण, वंदीन चरण डोळ्यांनी पाहीन रुप तुझे
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन भावें ओवाळीन म्हणे नामा
त्वमेव माता, पिता त्वमेव, त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव
कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात
करोमि यध्य्त सकलं परस्मे, नारायणायेति समर्पयामि
अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरि
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे
हरे राम, हरे राम, राम-राम, हरे-हरे
हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्णा-कृष्णा, हरे-हरे
हरे राम, हरे राम, राम-राम, हरे-हरे
हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्णा-कृष्णा, हरे-हरे