Jeev Rangla lyrics
by Shreya Ghoshal
[Chorus 1]
जीव दंगला, गुंगला, रंगला असा
पिरमाची आस तू ...
जीव लागला, लाभला, ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू ...
पैलतीरा नेशील, साथ मला देशील
काळीज माझं तू
सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू
[Chorus 2]
जीव दंगला, गुंगला, रंगला असा
पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला, ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू
[Verse: Hariharan & Shreya Ghoshal]
चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल सारी धरती तुझी
रुजव्याची माती तू
खुळं आभाळ ढगाळ, त्याला रुढींचा इटाळ माझ्या लाख सजणा
ही कांकणाची तोड माळ तू
खुळं काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण...
तुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचं गोंदण...
[Chorus 1]
जीव दंगला, गुंगला, रंगला असा
पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला, ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू
पैलतीरा नेशील, साथ मला देशील
काळीज माझं तू
सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं
पुनवंचा चांद तू
[Outro: Hariharan & Shreya Ghoshal]
जीव दंगला, गुंगला, रंगला असा
पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू
श्वास तू...