Paratun Ye Na lyrics
by Javed Ali
सुटला ठाव ये ना, तुटला गाव ये ना
सुटला ठाव ये ना, तुटला गाव ये ना
टीचल्या काळजाचा सलतो घाव ये ना
सरे मधुमास ये ना, पुरे वनवास ये ना
सरे मधुमास ये ना, पुरे वनवास ये ना
अंधारून आला नभ ओला परतून ये ना
अंधारून आला नभ ओला परतून ये ना
मेंदीच्या हाताने तू सडा अंगणाला दिला
सये, तुझ्या पावलांनी मातीला सुगंध आला
मेंदीच्या हाताने तू सडा अंगणाला दिला
सये, तुझ्या पावलांनी मातीला सुगंध आला
ओल्या हळदीच्या हाती केशरी शेला
सांज ही उदास ये ना, दिन हे भकास ये ना
पापणीच्या पाकळ्यांचा जळतो सुवास ये ना
सरे मधुमास ये ना, पुरे वनवास ये ना
सरे मधुमास ये ना, पुरे वनवास ये ना
अंधारून आला नभ ओला परतून ये ना
अंधारून आला नभ ओला परतून ये ना